विषय

☆★सूस्वागतम्★☆

विभाज्यातेच्या कसोट्या



विभाज्यतेच्या कसोट्या


विभाज्यतेच्या कसोटया : 2 ची कसोटी
  • कोणत्याही सम संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720

विभाज्यतेच्या कसोटया : 3 ची कसोटी
  • जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येसदेखील 3 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
  • 27720 या संख्येतील अंकांची बेरीज = 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18
  • 18 या संख्येतील अंकांची बेरीज = 1 + 8 = 9
  • 9 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला देखील 3 ने पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 4 ची कसोटी
  • जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे दोन्ही अंक 0 असतील, तर दिलेल्या संख्येसदेखील 4 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
  • 27720 या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 20.
  • 20 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो.
  • म्हणून 27720 ला देखील 4 ने पूर्ण भाग जातो.
  • गंमत म्हणून दुसरे उदाहरण घेऊ - 12345678900.
  • ही संख्या एका दमात कदाचित वाचताही येणार नाही. परंतु शेवटच्या दोन अंकांकडे पाहून या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो असे सांगू शकतो.

विभाज्यतेच्या कसोटया : 5 ची कसोटी
  • जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल, तर दिलेल्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

विभाज्यतेच्या कसोटया : 6 ची कसोटी
  • जर दिलेल्या संख्येस 2 o 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
  • ही संख्या सम असल्याने तिला 2 ने पूर्ण भाग जातो.
  • तिच्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्यामुळे 27720 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.
  • म्हणजेच या संख्येस 2 o 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो, म्हणून त्या संख्येस 6 नेही पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 7 ची कसोटी
  • दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी.
  • ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात असल्यास दिलेल्या संख्येसदेखील 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
  • या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ. उर्वरित संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु.
  • 2772 च्या एककस्थानचा अंक 2. त्याची दुप्पट 4. ती 277 मधून वजा करु. 277 - 4 = 273.
  • 273 साठी पुन्हा हीच कसोटी वापरु.
  • 273 च्या एककस्थानचा अंक 3. त्याची दुप्पट 6. ती 27 मधून वजा करु. 27 - 6 = 21.
  • 21 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 27720 ला देखील 7 ने पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 8 ची कसोटी
  • दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे तीन अंक 0 असतील, तर, दिलेल्या संख्येसदेखील 8 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
  • यात 27720 या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणारी संख्या 720. 720 ला 8 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला 8 ने पूर्ण भाग जातो.

विभाज्यतेच्या कसोटया : 9 ची कसोटी
  • दिलेल्या संख्येतील अंकांच्या एक अंकी बेरजेस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर, दिलेल्या संख्येसदेखील 9 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
  • 27720 : 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18, 18 : 1 + 8 = 9.
  • ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईलच असे नाही, मात्र, ज्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो.
______________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 10 ची कसोटी
  • जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी 0 अंक असेल, तर दिलेल्या संख्येस 10 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.
______________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 11 ची कसोटी : 
• ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
• उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
• 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
• 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

______________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 12 ची कसोटी : 
• ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.
____________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 13 ची कसोटी : 
• दिलेल्या संख्या च्या एकक स्थानचा अंकाची ...चार पट करून संख्या च्या राहीलेल्या भागात मिळवत जावे.
असे करत गेल्यास शेवटी येणाऱ्या संख्येस 13 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येस 13 ने निःशेष भाग जातो.
• उदाहरणार्थ - 16926
1692 + 24 = 1716
171 + 24 = 195
19 + 20 = 39
येथे 39 ला 13 ने पुर्ण भाग जातो .....
म्हणून 16926 ला पण 13 ने निःशेष भाग जातो.
____________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 15 ची कसोटी :  : 
• ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.
____________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 16 ची कसोटी :  : 
• ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.
____________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 17 ची कसोटी :
• एकक स्थानचा अंकाची 5 पट राहीलेल्या संख्येतून वजा करत गेल्यास शेवटी 17 ने भाग जाणारी संख्या असेल तर त्या संपूर्ण संख्येला 17 ने निःशेष भाग जातो .
• उदाहरणार्थ - 4352
4352 = 435 - 10 = 425
425 = 42 - 25 = 17
17 ला 17 ने भाग जातो.
म्हणून 4352 ला पण 17 ने पुर्ण भाग जातो.
उदाहरणार्थ . 436832
436832 = 43683 - 10=43673
43673 = 4367 - 15 = 4352
4352 = 435 - 10 = 425
425 = 42 - 25 = 17
म्हणून ....436832 ला 17 ने निःशेष भाग जातो
____________________________________________
विभाज्यतेच्या कसोटया : 18 ची कसोटी :
• ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
______________________________________________

विभाज्यतेच्या कसोटया : 19 ची कसोटी : -
वरीलप्रमाणे ....एकक दुप्पट करून मिळवा.
______________________________________________

 
विभाज्यतेच्या कसोटया : 23 ची कसोटी : -
एकक 7 पट करून मिळवा...
______________________________________________

विभाज्यतेच्या कसोटया : 29 ची कसोटी : -
एकक 3 पट करून मिळवा....
______________________________________________

विभाज्यतेच्या कसोटया : 31ची कसोटी : -
एकक 3 पट करून वजा करावे...
______________________________________________

विभाज्यतेच्या कसोटया : 37 ची कसोटी : -
एकक 11 पट करून वजा करावे...
______________________________________________








No comments:

Post a Comment